महाराष्ट्र

३०० किलो सोन्याच्या लुटीचा मास्टरमाइंड प्रिंस कुमार एनकाउंटरमध्ये ठार; वडिलांचे धक्कादायक समर्थन

पटना: ३०० किलो सोन्याच्या देशभरातील मोठ्या लूट प्रकरणांचा मास्टरमाइंड आणि कुख्यात गुन्हेगार प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार याचा पटना STF आणि वैशाली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एनकाउंटर झाला आहे. हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) पहाटे ही चकमक झाली.एनकाउंटरनंतर सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे मृतकाच्या वडिलांनीच पोलिसांच्या कारवाईचे उघड समर्थन केले आहे.

एनकाउंटरची थरारक घटना

गुप्त माहितीच्या आधारे प्रिंस कुमार हनुमान नगरमधील एका घरात लपून राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पटना STF आणि वैशाली पोलिसांनी संयुक्त छापा टाकला.छाप्यादरम्यान प्रिंसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर झालेल्या चकमकीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हाजीपूर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या कारवाईत प्रिंसचा एक साथीदार हत्यारांसह ताब्यात घेण्यात आला आहे.

वडिलांचे धक्कादायक विधान

मृतक प्रिंस कुमारचे वडील नंदकिशोर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत पोलिसांची बाजू घेतली.ते म्हणाले,“पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. मी स्वतः नेहमीच पोलिसांना त्याचा एनकाउंटर करण्यास सांगत होतो. तो कुटुंबाशी संबंधित नव्हता, तो गुन्हेगार होता. पोलिसांची कारवाई १०० टक्के योग्य आहे.”एनकाउंटरनंतर त्यांनी पोलिसांचे आभारही मानले.

गुन्हेगारी इतिहास थरारक

वैशालीचे एसपी विक्रम सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार हा वैशाली जिल्ह्यातील हुसैना (गोरौल पोलीस ठाणे हद्द) येथील रहिवासी होता.

तो बिहारातील कुख्यात सोनालूट करणारा गुन्हेगार सुबोध सिंहचा जवळचा सहकारी आणि शार्प शूटर होता.प्रिसवर चोरी, हत्या आणि आर्म्स अॅक्टसह ३० ते ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर २ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

फिल्मी स्टाइलमध्ये तुरुंगातून पलायन

२०१८ मध्ये हाजीपूर न्यायालयात एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करून तो फरार झाला होता. नंतर तो बेऊर जेलमध्ये बंद होता.

२ सप्टेंबर २०२५ रोजी उपचाराच्या बहाण्याने PMCH (पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल) येथे नेण्यात आले असताना, त्याने आठ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘मटण पार्टी’ देऊन एका खोलीत कोंडले आणि फिल्मी स्टाइलमध्ये पलायन केले होते.

देशभरात ३०० किलो सोन्याची लूट

प्रिंस कुमार आणि सुबोध सिंह टोळीने देशातील अनेक राज्यांतून मोठ्या प्रमाणात सोन्याची लूट केली होती. प्रमुख घटना पुढीलप्रमाणे 

२०१७: आसनसोल (पश्चिम बंगाल) – ५६ किलो सोनं

२०१९: हाजीपूर (बिहार) – ५५ किलो सोनं

२०२२: उदयपूर (राजस्थान) – २४ किलो सोनं

२०२२: कटनी (मध्य प्रदेश) – १६ किलो सोनं

२०२३: देहरादून – १८ किलो सोनं

पोलिसांचा मोठा दावा

पोलिसांनी या एनकाउंटरला मोठे यश मानले असून उर्वरित टोळी सदस्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बिहार पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधी लढ्याला नवे बळ मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

8 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

14 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

15 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

15 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

15 तास ago