विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; “दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही का?”
नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना सरकारकडून ३३ टक्के नुकसानीची अट घातली जात आहे. पाच हजार रुपयांच्या मदतीसाठीही अटी-शर्तींचा डोंगर उभा केला जात असून दिवाळी तोंडावर आली तरी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे ठोस नियोजन नसल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे इव्हेंट सुरू आहेत. कुंभमेळ्यातील ध्वजारोहणासाठी १६ कोटी रुपये, तर हेलिपॅडसाठी तीन कोटी रुपये खर्च केले जात असल्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. हाच पैसा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला असता, तर त्यांना मोठा दिलासा मिळाला असता, असे ते म्हणाले.
कुंभमेळ्याच्या नावाखाली इव्हेंटबाजी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील, तर सरकारने या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आत्महत्या करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींची तरतूद केली जाते, मग संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पुरेसा निधी का नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकारची अस्वस्थता का?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानाचे रक्षण, लोकशाहीची मजबुती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत, मतदार यादीतील बदलांबाबत तसेच फॉर्म क्रमांक ६ मधील सुधारणांबाबत प्रश्न विचारले जात असतील, तर केंद्र सरकारला त्याचा त्रास का होतो, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून देणे ही लोकशाहीतील महत्त्वाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अराजकता नव्हे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.
प्रश्न विचारणाऱ्यांना दोष देण्याऐवजी सरकारने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे स्पष्ट करत विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी मदत आणि निवडणूक प्रक्रियेच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…
फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…
शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…
‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…
सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…