पुणे: ‘स्टार प्रवाह’ वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेल्या करारी पण प्रेमळ अशा ‘पूर्णा आजी’ म्हणजेच ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांचं शनिवारी दुपारी पुण्यातील दिनानाथ हॉस्पिटलमध्ये निधन झालं अशी माहिती आहे. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजलेलं नाही.
ज्योती चांदेकर यांच्या पश्चात्य दोन मुली आहेत. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई होत्या. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीनं देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्योती चांदेकर यांनी ‘तिचा उंबरठा’, ‘ढोलकी’, ‘सुखांत’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘फुलवात’, ‘देवा’, ‘श्यामची आई’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी ‘छत्रीवाली’, ‘तू सौभाग्यवती हो’ यांसारख्या मालिकांमधील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. चांदेकर यांच्यावर रविवारी सकाळी (17 ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्माशनभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…