महाराष्ट्र

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी मराठी, हौशी हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, मराठी एकांकिका आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसह विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

या स्पर्धांमधील नाटकांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे, तसेच त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धक कलाकार आणि नाट्यसंस्थांना मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी यंदा इच्छुक कलाकारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करावा?

नाट्य स्पर्धांच्या परीक्षणासाठी इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत mahanatyaspardha.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहितीसाठी कलाकारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.

नाट्य क्षेत्रातील पात्र व अनुभवी कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

1 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago