शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन शेळ्या, दोन बोकड आणि एका बकराचा मृत्यू झाला, तर एका गाय जखमी झाली. या घटनेत शितल रंगनाथ राऊत (वय ३६) या शेतकरी महिलेचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मृत झालेल्या दोन शेळ्यांपैकी एक शेळी गाभण होती. त्यामुळे राऊत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेनंतर परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शितल राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १७ रोजी मध्यरात्री दिड ते दोन वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने त्यांच्या गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला करत त्याने दोन शेळ्या, दोन बोकड आणि एका बकराला ठार मारले. याच हल्ल्यात एका गायीलाही जखमी केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राऊत कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेळ्या-बोकड हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असते. त्यांचे संगोपन करण्यासाठी चारा, औषधोपचार आणि देखभालीवर खर्च करावा लागतो. मात्र, बिबट्याच्या एका हल्ल्यात वर्षभराची मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक मातीमोल ठरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

गाभण शेळीचाही मृत्यू; मोठा फटका
या हल्ल्यात मृत झालेल्या दोन शेळ्यांपैकी एक शेळी गाभण होती. त्यामुळे केवळ एका जनावराचेच नव्हे, तर त्यापासून भविष्यात मिळू शकणाऱ्या उत्पन्नाचेही नुकसान झाले आहे. आधीच शेती आणि पशुपालनातील वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना अशा घटनांमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढत आहेत.

पंचनामा झाला; आता बिबट्याच्या बंदोबस्ताचे काय..?
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, पंचनामा करणे ही प्राथमिक कार्यवाही असली, तरी त्यानंतर बिबट्याचा वावर लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का…? शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार…? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.

ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी
निमगाव भोगी परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना शेती आणि पशुपालनातून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे त्यांच्या उरल्यासुरल्या आधारालाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे केवळ पंचनाम्यांच्या कागदोपत्री कार्यवाहीवर न थांबता वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा, अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि पशुपालकांमधील भीती कायम राहण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

15 तास ago