महाराष्ट्र

भविष्यात ST ची बसस्थानके सुंदर व सुशोभित करण्यासाठी वास्तुविशारदांनी आपले योगदान द्यावे

ठाणे: भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातुन पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाचे ” रोल मॉडेल ” तयार करावे असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ” इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ” यांच्या माध्यमातून ठाणे येथे भरवलेल्या दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते. या वेळी राज्यभरात एसटीच्या जमिनीवर विकसित होणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण मंत्री सरनाईक यांनी केले.

भविष्यात मोक्याच्या ठिकाणी विखुरलेल्या एसटीच्या सुमारे ३ हजार एकर जमीनीचा विकास करण्यासाठी सर्व समावेश आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामध्ये वास्तुविशारद म्हणून आपल्या सूचना आणि प्रस्ताव दिल्यास तो आराखडा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करणे शक्य होईल. भविष्यात एसटीची सर्व बसस्थानके, आगारे ही वास्तुविशारदाच्या सौंदरदृष्टीने विकसित झालेले असतील. ” एसटीच्या जमीनीवर उभा राहणाऱ्या प्रकल्पामध्ये आपल्या कौशल्यपूर्ण योगदानातून निर्माण झालेल्या वास्तू येणाऱ्या पिढीला प्रेरक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो ” असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार संजय केळकर व जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट महाराष्ट्र आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago