महाराष्ट्र

एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थांचा कलाविष्का

कलादिग्दर्शक नितिन देसाईंनी सुरु केलेली परंपरा फिल्मसिटीने जोपासली

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ येथे प्रजासत्ताक दिनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे.

यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा हलीवलीचे विद्यार्थी ‘शेतकरी नृत्य’ सादर करणार असून आसलपाडा शाळेचे विद्यार्थी ‘पथनाट्य’ सादर करणार आहेत. शारदा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी ‘लेझीम व डंबेल्स’चे सादरीकरण करणार आहेत. कर्जत महिला मंडळ विद्या विकास मंदिराचे विद्यार्थी ‘इतिहास का में’ आणि ‘युनिटी इन डायव्हरसिटी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील हातनोली कातकरवाडी शाळेतील विद्यार्थी ‘आदिवासी नृत्य’ सादर करणार आहेत. या अनोख्या कार्यक्रमात ११३ विद्यार्थी आणि १७ शिक्षकांचा सहभाग असणार आहे.अशी माहिती एन.डी चे स्टूडियो वित्त अधिकारी महेश भांगरे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago