महाराष्ट्र

दारू महागली म्हणून तरुण ब्रॅड बदलत लागले हातभट्टी दारूच्या नादी

सोलापूर जिल्ह्यात दिवस-रात्र हातभट्ट्या सुरू; बनावट दारूचीही निर्मिती 

सोलापूर: गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते, याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काहीजण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात. तरुणांच्या भविष्यासाठी गावागावांतील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरीपण गावांमध्ये खुलेआम हातभट्टी विक्री सुरू आहे. आता देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावांत सहजपणे पोच केली जात आहे. दुसरीकडे सोलापूर शहर हद्दीत विषारी ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे.

राज्य सरकारने देशी-विदेशी दारूवरील टॅक्स वाढविला आहे. त्यामुळे आता १८० मिलिलिटर देशी दारूची बाटली ८० रुपये, मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू २०५ रुपये आणि विदेशी मद्याचे प्रीमिअम ब्रॅंड ३६० रुपयास झाली आहे. त्यामुळे अनेकजण देशी-विदेशी दारूऐवजी हातभट्टी किंवा विषारी ताडीकडे वळत आहेत. पोलिसांकडील माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची निर्मिती होते. सध्या देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने त्या हातभट्ट्या दिवस-रात्र पेटलेल्या दिसत आहेत. महागडी दारू पिणे परवडत नसल्याने अनेकांनी ब्रॅंड बदलला आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात गावागावातील तरुण हातभट्टीच्या आहारी जातील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल, अशी भीती वर्तविली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती

अकलूज (ता. माळशिरस) व चौभेपिंपरी (ता. माढा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाडी टाकून ३० लिटर स्पिरीट, गोवा राज्यनिर्मित १५३ लिटर विदेशी मद्य, ८९ लिटर बनावट विदेशी मद्य, विदेशी मद्याचे तेराशे बनावट लेबल, दीड हजार बूच, रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याचे दोन सीलिंग मशिन जप्त केले. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

जीवघेणी हातभट्टी अन्‌ ताडीची खुलेआम विक्री

राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) १ ते २४ जुलै या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती केंद्रावर व अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात ५८ हजार लिटर गूळमिश्रित रसायन, तीन हजार ८९४ लिटर हातभट्टी, साडेआठशे लिटर देशी-विदेशी मद्य, ७९८ लिटर ताडी जप्त केली आहे. २४ दिवसांतील कारवाईत ‘एक्साईज’च्या पथकांनी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मात्र सातत्य दिसत नाही आणि सोलापूर शहर पोलिसांना तर शहरातील ताडी, हातभट्टी विक्री अद्याप दिसलेलीच नाही हे विशेष.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago