महाराष्ट्र

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या भेटीवरही त्यांनी स्पष्टता आणली.

धनंजय मुंडेंना पुन्हा संधी

धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले होते, परंतु उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली आहे. याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. अजित पवार म्हणाले, कृषी खात्यातील आरोपांमुळे मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, ज्याची भरपाई होऊ शकत नाही.

सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे नाव जोडले गेले असून, याबाबत न्यायालयीन चौकशी सुरू आहे. “ही चौकशी पूर्ण झाल्यावर आणि मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्यास त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली जाईल,” असं पवारांनी ठामपणे सांगितलं.

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर निर्णय लवकर

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली असून, अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांशी बोलून कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अंतिम करू.”

पुण्यातील गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत अजित पवार यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले. “काही लोक समाजात दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड करतात. अशा आरोपींना कॅमेऱ्यांद्वारे शोधून कठोर कारवाई करा, जेणेकरून पुन्हा असं धाडस कोणी करणार नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे भेट

छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीत घाडगे यांनी आपली बाजू मांडली. पवार म्हणाले, “घाडगे यांना मारहाण करणं चुकीचं होतं. ज्यांनी मारहाण केली, त्यांचा पक्षातील पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.”

रोहित पवारांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फोन टॅपिंगचे आरोप केले असून, यावर अजित पवारांनी ठामपणे सांगितलं, आरोप करायचे असतील तर पुरावे द्या. केवळ आरोप करून चालणार नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago