महाराष्ट्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये तीनवेळा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थ वर राज ठाकरेंच्या घरी आल्याने पुन्हा एकदा मनोमीलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पोस्ट केली आहे. बाळा नांदगांवकर यांनी या भेटीसंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.

बाळा नांदगावकर यांची पोस्ट काय

गणेश चतुर्थी निमित्त सालाबाद प्रमाणे राज ठाकरे यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झाले. तरी यावर्षी या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला कारण आज अनेक वर्षानंतर उद्धव साहेब हे सहपरिवार बाप्पाच्या दर्शनाला आले. मी देखील सहपरिवार या सुवर्णक्षणाचा साक्षीदार झालो. यावेळी दोन्ही ठाकरे आणि त्यांच्या परिवाराबरोबर माझे कुटुंब एकत्र येऊन टिपलेला हा क्षण म्हणजे जीवनातील परमानंदच.राजकारण होत राहील पण ठाकरे कुटुंब एकत्र येणे हे माझ्यासारख्या असंख्य ठाकरे प्रेमींना अतिशय आनंद देणारे आहे. या बद्दल मनात एकच येते की खरंच बाप्पा पावला.

ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून बाळा नांदगावकर अनेक वर्षे प्रयत्न करत होते

बाळा नांदगांवकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजेत म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु ठेवले होते. त्या प्रयत्नांना यश आल्यानं आणि गणेश चतुर्थीचा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर बाळा नांदगांवकर यांनी त्यांच्या भावना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडल्या. दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे माझ्या सारख्या ठाकरे प्रेमींना आनंद देणारं असल्याचं देखील बाळा नांदगांवकर यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भातील निर्णय रद्द झाल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी एकत्र विजयी मेळावा घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थान येथे गेले होते. तर, गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थला भेट दिली.

दरम्यान मनसेचे नेते राजू पाटील यांनी “आज ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.” असं म्हणत टोलेबाजी केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

22 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

22 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 दिवस ago