महाराष्ट्र

NEET 2026 मध्ये बारामतीची श्रावणी देशात अव्वल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ कॉलवरून गौरव

मुंबई: नीट (NEET) २०२६ परीक्षेत बारामतीच्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने बारामतीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

श्रावणीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधून मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. तसेच, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी श्रावणीला शुभेच्छा दिल्या.

बारामतीच्या कन्येच्या या यशामुळे संपूर्ण राज्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

4 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago