महाराष्ट्र

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थित राहून पुनर्विकसित स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण केले.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि शैक्षणिक विकासाला गती देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून अमृत भारत स्टेशन योजना हा त्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुमारे २६.५ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. स्थानकात आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा, सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालन उभारण्यात आले आहे.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. २,०८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार यांनी पुनर्विकसित स्थानकाची पाहणी केली. तसेच रेल्वेत जाऊन विक्रेते आणि प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले.

या कार्यक्रमाला पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

2 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

24 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago