महाराष्ट्र

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवार, १६ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथील पालखीतळ मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी संजय जगताप यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवि अनासपुरे, बाबा जाधव आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

संजय जगताप आणि तमाम कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच पुरंदर तालुक्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे, असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

5 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

5 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

13 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

13 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

13 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

13 तास ago