महाराष्ट्र

अधिवेशनादरम्यान मोठा ‘धमाका’, IAS सह २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहेत. या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका कायम आहे.

गेल्या तीन दिवसांत झालेल्या मोठ्या IAS बदल्यांनंतर, राज्य सरकारने पुन्हा एकदा २० महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.या बदल्यांमध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, काही अधिकाऱ्यांची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर काहींच्या पदावर बदल करण्यात आला आहे.

कोण कोणत्या पदावर? बदली झालेल्या २० अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी

१) एम. एम. सूर्यवंशी (भा.प्र.से. : एस.सी.एस. : २०१०)

पूर्वीचे पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

नवीन पद: महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई

२. दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से. : आर.आर. : २०११)

पूर्वीचे पद: अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे

नवीन पद: समाज कल्याण आयुक्त, पुणे

३) नीलेश गातणे (भा.प्र.से. : एस.सी.एस. : २०१२)

पूर्वीचे पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

४) ज्ञानेश्वर खिलारी (भा.प्र.से. : एस.सी.एस. : २०१३)

पूर्वीचे पद: संचालक, ओ.बी.सी., बहुजन कल्याण, पुणे

नवीन पद: अतिरिक्त बंदोबस्त आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे

५) अनिलकुमार पवार (भा.प्र.से. : एस.सी.एस. : २०१४)

पूर्वीचे पद: महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई

नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.एम.आर.एस.आर.ए., ठाणे

६) सतीशकुमार खडके (भा.प्र.से. : एस.सी.एस. : २०१४)

पूर्वीचे पद: संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई

नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

7) भालचंद्र चव्हाण (भा.प्र.से. : नॉन-एस.सी.एस. : २०१९)

पूर्वीचे पद: आयुक्त, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे

नवीन पद: संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई

८) सिद्धार्थ शुक्ला (भा.प्र.से. : आर.आर. : २०२३)

पूर्वीचे पद (बदल): सहायक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर

नवीन पद: प्रकल्प अधिकारी, आय.टी.डी.पी., धारणी आणि सहायक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती

९) विजयसिंग शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अतिरिक्त आयुक्त-२, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई

१०) विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, भंडारा

नवीन पद: सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर

११) त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अतिरिक्त महासंचालक, मेडा, पुणे

नवीन पद: उपमहासंचालक, यशदा, पुणे

१२) गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे (नियुक्ती कायम)

१३) पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, लातूर

नवीन पद: अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे

१४) महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग, पुणे

नवीन पद: आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे

१५) मंजिरी मधुसूदन मनोळकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: संयुक्त आयुक्त, (पुनर्वसन), नाशिक विभाग, नाशिक

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे

१६) आशा अफजल खान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: संयुक्त सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर

नवीन पद: संयुक्त सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर (नियुक्ती कायम)

१७) राजलक्ष्मी शफीक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अतिरिक्त विभागीय आयुक्त (सामान्य), कोकण विभाग, मुंबई

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, माविम, मुंबई

१८) सोनाली नीळकंठ मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, अमरावती

नवीन पद: संचालक, ओ.बी.सी., बहुजन कल्याण, पुणे

१९) गजेंद्र चिमणराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, बुलढाणा

नवीन पद: आयुक्त, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे

२०) प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, भा.प्र.से. मध्ये पदोन्नत)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, सांगली

नवीन पद: आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजीनगर

या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल झाले आहेत, ज्याचे परिणाम आगामी काळात स्थानिक निवडणुका आणि प्रशासकीय कामकाजावर दिसून येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago