महाराष्ट्र

राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात पडणार मोठी फूट

बिहार: महाराष्ट्राच्या दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फूटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथीही घडल्या. यानंतर देशाच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव (१८ जुलै) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. ते संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील. नवीन पक्ष/संघटनेची माहिती यामध्ये दिली जाऊ शकते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांना सहा वर्षांसाठी राजदमधून काढून टाकले होते. एवढेच नाही तर त्यांना कुटुंबातूनही काढून टाकण्यात आले होते. एकीकडे या वर्षी म्हणजेच २०२५ बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेज प्रताप यादव सध्या हसनपूरचे आमदार आहेत. ते २०१५ ते २०२० पर्यंत महुआचे आमदार होते. राज्यात ऐन निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांपासून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर ते आता स्वत:चा वेगळा मार्ग चाचपडताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत ते आपली ताकद दाखवू शकतात असे मानले जाते.

पक्ष-परिवारापासून दूर राहण्याचे कारण काय

संपूर्ण प्रकरण अनुष्का यादवशी संबंधित आहे. एकीकडे, तेज प्रताप यादव यांचा ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटाचा खटला सुरू आहे. घटस्फोटाचे प्रकरण सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांनी अनुष्का यादव या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे एक्स ट्विटर पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले. त्यांच्या पोस्टनंतर वडील लालू प्रसाद यादव यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून तेजप्रताप यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना कुटुंबातूनही काढून टाकण्यात आले होते. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर केले आहे. स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली.

या पोस्टमध्ये लालूंनी स्पष्ट शब्दांत लिहिले की, ‘वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे उपक्रम, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वागणूक ही आमच्या कौटुंबिक मूल्यांना अनुरूप नाही. त्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. लालू प्रसाद यादव यांनी लिहिले आहे की, ‘त्या व्यक्तीला (तेज प्रतापला) ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ती व्यक्ती आता पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका बजावणार नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णय तिने स्वतः घ्यावेत, आणि इतरांनीही विवेकबुद्धीनेच संबंध ठेवावेत.’ या पार्श्वभूमीवर अनुष्का यादव तेज प्रतापसोबत नव्या पक्षात सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेज प्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यात अनुष्का यादवही सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र बिहारच्या राजकारणात नेहमीच नाट्यमय घडामोडी घडत असतात, त्यामुळे काहीही शक्य आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

7 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

7 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

7 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

7 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

7 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

7 तास ago