महाराष्ट्र

पडळकरांच्या ‘त्या’ समर्थकावर कारवाईचा बडगा

मुंबई: विधीमंडळाच्या परिसरात काल १७ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत हाणामाऱ्या झाल्या. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असून गोपीचंद पडखळकरांच्या कार्यकर्त्यांवर रात्रीपर्यंत कारवाई झाली नाही.त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी काल समर्थकांसह पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले.

दरम्यान जितेंद्र आव्हाड समर्थकानंतर पडळकरांच्या समर्थकांवर फौजदारी कारवाई होत असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधिमंडळ परिसरात काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात सांगितलं. हे दोघेही विधिमंडळात अनाधिकृतपणे आले होते. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती असं अध्यक्ष म्हणाले.

काय घडला होता प्रकार

विधानभवनाच्या लॉबीत १७ जुलैला सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये थेट विधिमंडळाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या वादाची सुरुवात मागील आठवड्यात झाली होती, जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर यांना पाहून ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणाबाजी केली होती.यावर पडळकर संतापले होते.

5 दिवसानंतर बुधवारी १६ जुलैला विधानभवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर गुरुवारी १७ जुलैला पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांचे पडसाद विधानभवनाच्या लॉबीत उमटले, जिथे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात अक्षरशः कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली.

विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा

“यापुढे विधानसभेचे अधिवेशन जेव्हा, जेव्हा असेल तेव्हा फक्त विधानसभा सदस्य (आमदार), त्यांचे स्वीय सहायक (पीए) आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.” असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घोषणा केली.

पाच जणांची मारहाण पण एकालाच अटक; जितेंद्र आव्हाड

विधिमंडळ परिसरात आपल्या कार्यकर्त्याला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाच कार्यकर्त्यांनी मारहाण केली.‌ मात्र केवळ एकाच जणाला अटक झाली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणामुळे भाजपची सुसंस्कृत प्रतिमा धुळीस मिळाली असं आव्हाड म्हणाले. नितीन देशमुख माझ्यासोबत नव्हते असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काल विधानभवन परिसरात झालेल्या राड्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “हा विद्रोही तुकारामांचा महाराष्ट्र आहे.इथ बंडाचा आवाज दाबता येईल,या आविर्भावात इथल्या सरकारने राहू नये..! आम्ही षंढ नाहीं आहोत.शिव, शाहू,फुले,आंबेडकरांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे. आम्ही लढत राहू…सत्याचा विजय होईपर्यंत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago