महाराष्ट्र

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार टीका

मुंबई: राज्यातील खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) कक्षेत आणण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारला आता सुचलेले शहाणपण म्हणजे केवळ ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असल्याचा आरोप त्यांनी केला.

“राज्यातील खासगी विद्यापीठे आणि स्वायत्त शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केले. सरकारच्या डोळ्यांवर भ्रष्टाचाराची झापडे असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश त्यांना दिसत नव्हता,” असा घणाघात मातेले यांनी केला.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि विविध घटकांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली असल्याचा दावाही त्यांनी केला. “विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्रोशामुळे अखेर सरकारला झुकावे लागले असून आता शुल्क नियंत्रणाबाबत चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, केवळ चर्चा आणि चाचपणी नको, तर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे,” असे मातेले म्हणाले.

आगामी अधिवेशनात कायदा करण्याची मागणी

खासगी विद्यापीठांच्या शुल्क नियंत्रणासाठी आगामी अधिवेशनातच FRA कायद्यात ठोस आणि कठोर सुधारणा कराव्यात, अशी मागणी मातेले यांनी केली. खासगी विद्यापीठांमधील व्यावसायिक तसेच गैर-व्यावसायिक सर्व अभ्यासक्रमांवर FRAचे प्रभावी नियंत्रण आणून मनमानी शुल्कवसुलीला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली.तसेच, आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारल्याचा आरोप असलेल्या खासगी विद्यापीठांच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘कायदा झाला नाही तर आंदोलन तीव्र करू’

“आगामी अधिवेशनात सरकारने यावर तातडीने कायदा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. सरकारविरोधातील हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

12 मिनिटे ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

20 मिनिटे ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

17 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

17 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

17 तास ago

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…

17 तास ago