महाराष्ट्र

भावानेच केला भावाचा निर्घृण खून

टेंभुर्णी: माढा तालुक्यातील अरण येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय 38) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. भावकीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

शनिवारी सकाळी जाधववाडी (ता. माढा) शिवारात बेपत्ता कार्तिक खंडाळे याचा कॅनॉलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. त्याचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले. या ठिकाणी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनेने अवघा जिल्हा हादरून गेला आहे. त्याचा निर्घृण खून कोणी व कशासाठी केला, याची चर्चा होत होती. तसेच आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती.

गुन्हा दाखल होताच सोलापूर येथील गुन्हे शाखा व टेंभुर्णी पोलिसांची पाच पथके तपास करीत होती. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह जाधववाडी शिवारात कॅनॉलमध्ये मिळून आला. तेथे दुर्गंधी पसरली होती. मृतदेहाशेजारी दोन चाकू, मोजे व रक्त लागलेला दगड मिळून आला होता. या ठिकाणी सोलापूर येथील श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती. त्याचे सोलापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अरण येथे शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी कामगीरी पार पाडली.

भावकीच्या वादातून खून

कार्तिक खंडाळेच्या खून प्रकरणानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. वरिष्ठ स्तरावरून या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती. पोलिसांनी संदेश खंडाळे यास संशयित म्हणून तांत्रिक विश्लेषणाद्वारे ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना भावकीच्या वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे; मात्र नेमका वाद काय होता, हे समजले नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

1 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

1 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

1 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

2 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

2 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

15 तास ago