महाराष्ट्र

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात तरुणाईला रस्त्यावर उतरावे लागले नसते, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला, विशेषतः विद्यार्थिनींचा मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पोटात गोळा उठला आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या वर्मावर घाव घातल्यानेच फडणवीस या अभियानावर टीका करत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला.

‘एकही परीक्षा व्यवस्थित घेता आली नाही’

भाजप सरकारला एकही परीक्षा व्यवस्थित घेता आलेली नाही. NET, CBSE, तलाठी, TET, न्यायालयातील लिपिक, पुणे महापालिका भरती, MMRDA, MPSC आणि FDA यांसह विविध परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार समोर आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. त्यामुळे प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नसल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसवर खोटे आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले.

‘महिला आरक्षणाला विरोध नाही, भाजपच्या मानसिकतेला विरोध’

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप धादांत खोटा आणि हास्यास्पद असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा काँग्रेस पहिला पक्ष आहे. विधानसभा आणि लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती, असे त्यांनी नमूद केले.

महिला आरक्षणाला विरोध नसून भाजपच्या मानसिकतेला विरोध आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून देशाचे दक्षिण आणि उत्तर असे दोन तुकडे करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला.

फडणवीस यांनी काँग्रेसला महिलांना संधी देण्याचा सल्ला देण्यापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देऊन आदर्श घालून द्यावा. पंकजा मुंडे यांचे पक्षात कोणी आणि कसे खच्चीकरण केले, हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

‘वंदे मातरम्’ आधी RSSच्या शाखेत सुरू करा

‘वंदे मातरम्’ला काँग्रेसचा विरोध असल्याचे चित्र भाजपकडून निर्माण केले जात आहे. मात्र, स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’ गात देशासाठी बलिदान दिले. काँग्रेसनेच ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला, असा दावा सपकाळ यांनी केला.सोनिया गांधी यांच्याबद्दल ‘वंदे मातरम्’वरून खोटे आरोप करणे भाजपने थांबवावे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत ‘वंदे मातरम्’ गायला सुरुवात करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

‘गेट वेल सून देवेंद्र फडणवीस’

ज्यांचा इतिहासच खोटेपणावर रचलेला आहे आणि ज्यांचे स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नाही, त्यांनी ‘वंदे मातरम्’, महिला आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाबद्दल बोलणे हा मोठा विनोद आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. ‘गेट वेल सून देवेंद्र फडणवीस’, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

6 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

11 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

13 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

14 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago