महाराष्ट्र

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यातील कामांना सुरुवात झाली आहे. तसेच भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपये आणि परिसरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी भगवान भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, बळीराजा सुखी व्हावा तसेच शेतकऱ्यांवरील सर्व संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

भीमाशंकर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे धार्मिक सुविधांसोबतच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. २८८ कोटींच्या विकास आराखड्यामुळे भीमाशंकर परिसराचा नियोजनबद्ध विकास होऊन भाविकांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

भीमाशंकर हे धार्मिक महत्त्वासोबतच निसर्गसंपन्न परिसरामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधा विकसित झाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविक-पर्यटकांसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे आणि आकर्षक होईल. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

तीर्थक्षेत्राच्या विकासासोबत स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांनाही शासनाने प्राधान्य दिले आहे. भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, परिसरातील रस्त्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या सुविधांसोबत स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांचा विकासही साधला जाणार आहे.

शासनाने हाती घेतलेली सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील आणि भीमाशंकरला येणाऱ्या लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या सुविधांमुळे भाविकांचा आनंद द्विगुणित होण्यासोबतच संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी, युवा, कामगार, कष्टकरी आणि वारकरी अशा महाराष्ट्रातील सर्व घटकांच्या सुख-समाधानासाठी भगवान भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केली, असेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेवर भगवान भीमाशंकराचा आशीर्वाद कायम राहावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी आमदार शरद सोनवणे, मावळ लोकसभा सह-संपर्कप्रमुख विकास रेपाळे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago