महाराष्ट्र

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का, मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

प्रशांत कोरटकर अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे, त्याला का दाखवत नाहीत. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे.

प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago