दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल ४० रुपये लिटर करण्याच्या ‘सौगात’चे काय झाले
मुंबई: नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून २००२ साली गुजरात मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक सामाजाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्रीपद न देणे, मोदींच्या पक्षातील आणि त्यांच्या मातृसंस्थेतील सहकाऱ्यांनी या समाजावर अत्यंत खालच्या भाषेत अपमानजनक वक्तव्ये व अत्याचार केले. हे सर्व पाहता सौगात-ए-मोदी म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, असे आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ईद निमित्त भारतीय जनता पक्ष ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही ‘सौगात’ देत असताना दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…