महाराष्ट्र

शरद पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा समितीने केला नामंजूर…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी आदरणीय शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी प्रत्यक्ष करणार असल्याचेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.

‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती असेही प्रफुल पटेल म्हणाले.

पवारसाहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला. त्यावर पवारसाहेबांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाला, राज्याला, पक्षाला पवारसाहेबांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार साहेबच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

6 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago