महाराष्ट्र

देव आणि संघटना यातील फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य…

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि देवाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या संघटना यातील फरक पंतप्रधानांना कळत नाही हे देशाचे दुर्भाग्य असल्याचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बजरंगबलीचे भक्त आम्हीही आहोत, त्याची उपासनाही करतो पण त्याचा सार्वजनिक दिखावा करत नाही. धर्माच्या नावाने जनतेला लुटणाऱ्या संघटना नसाव्यात परंतु काही लोक धर्माच्या नावाने लुटत आहेत. देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था कोणत्याही धर्मात असेल तर त्या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे तरच लोकांचा धर्मावरचा विश्वास वाढेल. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु कर्नाटकची जनता भाजपाचा हा कुटील हेतू समजते.

बजरंग दलावर बंदी घातल्यास बजरंग बलीचा अपमान होतो हा भाजपाचा आरोप धादांत खोटा आहे. भाजपाला राम, हनुमान किंवा कोणत्याही देवाबद्दल प्रेम नाही, भाजपा देवाचा व धर्माचा फक्त सत्तेसाठी वापर करतो. बजरंग दलाच्यावरुन आरडाओरड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर सरकारनेच गोव्यात श्रीराम सेनेवर बंदी घातली होती, त्यावेळी रामाचा अपमान झाला असे वाटले नाही का? त्यामुळे भाजपासाठी देव हे फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच आहेत त्यांचे हे ढोंग जनतेला माहित आहे, भाजपाच्या या कांगाव्याला कोणी फसणार नाही.

उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील अंगोला येथील प्रचारादरम्यान भाजपा पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गणपतीची मूर्ती भेट देत असताना मोदींनी गणपती मूर्ती हाताने बाजूला करत त्या कार्यकर्त्यालाही बाजूला सारून गणपतीचा अपमान केला, त्यावर भाजपा नेते का बोलत नाहीत? एकीकडे गणपतीचा अपमान करायचा व दुसरीकडे बजरंगबलीच्या नावाने गळे काढायचे हे भाजपाचे दुटप्पी धोरण नाही का? गणपतीचा अपमान केल्याबद्दल भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे.

मी पुन्हा येईन..

नाना पटोले म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो तसा पुन्हा आलो आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण पुन्हा आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्रपदावर आले, माझ्यासारखा असता तर खालच्या पदावर आलाच नसता असा टोला मारत कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार की नाही याची चिंता करण्याऐवजी फडणवीसांनी भाजपा कर्नाटकात सत्तेत येईल का? याची जास्त चिंता करावी, असेही पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

4 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

8 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

11 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

12 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago