महाराष्ट्र

2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल येथील स्मारकाचे रखडलेले काम आता अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, कामात होणारी दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याचे सुधारित वेळापत्रक सादर करावे आणि एमएमआरडीएने या कामावर दररोज लक्ष ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली इंदू मिल स्मारकाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी स्मारकाच्या प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेवर चर्चा करण्यात आली.

कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही; पर्यायी कंत्राटदाराचाही विचार

स्मारकाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांचे कारण देऊन काम थांबविणे योग्य नाही. संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाई करण्याचे पर्याय तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आर्थिक मागण्यांची होणार सखोल तपासणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक हा जनभावनेशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या कामाकडे केवळ एक बांधकाम प्रकल्प म्हणून न पाहता त्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

स्टील उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करा

स्मारकाच्या स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्मारकाच्या सामाजिक महत्त्वाची जाणीव ठेवून काम करा – संजय शिरसाट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक हा जनभावनेशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या कामाकडे केवळ एक बांधकाम प्रकल्प म्हणून न पाहता त्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याची मुदत निश्चित करताना आवश्यक नियोजन आणि संभाव्य जोखमींचा विचार करणे अपेक्षित होते. कोणतेही कारण देऊन दहा महिने काम थांबविणे योग्य नाही. शासनाकडून आर्थिक बाबींची नियमानुसार छाननी केली जाईल; मात्र त्यामुळे स्मारकाचे काम रखडता कामा नये. कंत्राटदाराने ठोस नियोजन करून कामाला गती द्यावी, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, शापूरजी पालोनजी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प सल्लागार तसेच ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार उपस्थित होते.

२०२७ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आता निश्चित झाले असले, तरी प्रत्यक्ष कामाचा वेग वाढविणे आणि कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करणे हेच सरकारसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता…

20 मिनिटे ago

रायगडावरील गडकोटांचे पावित्र्य जपा; संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करा; एकनाथ शिंदे

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन…

23 मिनिटे ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार; भाजप सरकारवर सपकाळांचा घणाघात!

“संविधान धोक्यात, लोकशाही वाचवणे ही काळाची गरज”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी ठाणे: भारतीय…

26 मिनिटे ago

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी…

4 तास ago

शिरूरमध्ये ‘पोलीस’ असल्याचा बनाव रचला, भामट्यांनी सोनं आणि रोख रकमेवर मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : 'पुढे पोलीस कारवाई व दंड करत आहेत, आम्हीही पोलीसच आहोत, तुमचे…

4 तास ago

शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक…

1 दिवस ago