महाराष्ट्र

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार; भाजप सरकारवर सपकाळांचा घणाघात!

“संविधान धोक्यात, लोकशाही वाचवणे ही काळाची गरज”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी

ठाणे: भारतीय संविधानाने देशातील सर्व जाती, धर्म, महिला आणि वंचित घटकांना समान अधिकार दिले आहेत. मात्र, भाजपचे मोदी-शाह सरकार सर्वसामान्य जनतेचे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज धोक्यात असून त्याचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केला.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान रक्षणाची शपथ दिली.

भाजपचे संविधान प्रेम म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम!

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की, देशात संविधाननिर्मितीची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी भारतीय जनता पक्ष अस्तित्वात नव्हता; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र पाठवून मनुस्मृतीनुसार देशाचे संविधान लिहिण्याची भूमिका मांडली होती, असा आरोप सपकाळ यांनी केला.

मनुस्मृती आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ला महत्त्व देणाऱ्या भाजपला आज संविधानाचा पुळका आला आहे. भाजपचे संविधानप्रेम हे केवळ दिखाऊ असून ते पुतणा मावशीच्या प्रेमासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची आहे. संविधान आणि लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांनीच आज संविधान बचावचा नारा देणे हास्यास्पद आहे. मागील १३ वर्षांपासून संविधानाची पायमल्ली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील असंवैधानिक सरकार ठाण्यातून आले असून ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीही गंभीर बनली आहे. हत्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संविधान रक्षणाचा संदेश देण्यासाठी ठाण्यातून ही रॅली काढण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा!

पुण्यात न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीवर झालेल्या गंभीर हल्ल्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुण्याला कोयता नगरी बनवायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गुन्हेगारी प्रचंड वाढत असून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्याला पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

लोकशाही वाचवण्यासाठी लढा उभारण्याचे सतेज पाटील यांचे आवाहन

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, तीन-चार वर्षांपूर्वी लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाली. त्यामुळे संविधान वाचवण्याचा संदेश देण्यासाठी ठाण्यातून ही रॅली काढण्यात आली आहे. देशात वोटचोरी होत असून गोकुळमधील सत्ताही भाजपने चोरल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेने निवडून दिल्यानंतर सरकारने संविधानानुसारच कारभार केला पाहिजे. मात्र, भाजप संविधानाला मानत नाही. आपण एकजुटीने लढलो तर जिंकू शकतो, हे लक्षात ठेवा. राज्यात शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न : थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संविधानात समता, बंधुता आणि साधुसंतांच्या विचारांचा समावेश आहे. मात्र, याच विचारांवर भाजप सरकार घाला घालत असून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचे काम करत आहे.

मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. आज त्याच संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. वोटचोरी आणि सरकार पाडण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. देशातील हे चित्र बदलण्याची गरज आहे, असे थोरात म्हणाले.

संविधानाने दिलेल्या अधिकारांवरच गदा : नसीम खान

माजी मंत्री नसीम खान यांनीही भाजप सरकारवर टीका केली. देशाचे संविधान धोक्यात आले असून मागील १३ वर्षांपासून लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली केली जात आहे. एका बाजूला भाजपकडून घटनात्मक मूल्यांना धक्का दिला जात असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहेत.संविधानाने सर्व जाती, धर्म, भाषा आणि पंथांच्या नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. मात्र, आज याच हक्कांवर गदा आणली जात असल्याचे खान यांनी सांगितले.

काँग्रेसचे दिग्गज नेते रॅलीत सहभागी

या संविधान बचाव रॅलीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, शोभा बच्छाव, प्रणिती शिंदे, रविंद्र चव्हाण, शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सुनीता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, मोहन जोशी, ॲड. गणेश पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार भाई जगताप आणि मुजफ्फर हुसेन यांनीही यावेळी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल…

8 मिनिटे ago

क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता…

12 मिनिटे ago

रायगडावरील गडकोटांचे पावित्र्य जपा; संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करा; एकनाथ शिंदे

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन…

15 मिनिटे ago

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी…

3 तास ago

शिरूरमध्ये ‘पोलीस’ असल्याचा बनाव रचला, भामट्यांनी सोनं आणि रोख रकमेवर मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : 'पुढे पोलीस कारवाई व दंड करत आहेत, आम्हीही पोलीसच आहोत, तुमचे…

4 तास ago

शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक…

1 दिवस ago