प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत संशयास्पद (Anomalous) आणि ‘Unmapped’ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, या नावांवर कोणत्याही प्रकारची खूण करण्यात आलेली नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे.

या मतदारांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या मतदारांना नोटीस बजावली जाणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करून ती सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रियेदरम्यान १ कोटी ५२ लाख मतदार सापडले नाहीत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे दाखवण्यात आले, असा दावा काँग्रेसने केला आहे. याच पद्धतीचा वापर बीएलओंकडून केला जाऊन भविष्यात आणखी कोट्यवधी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली.

दरम्यान, विधानसभा मतदारसंघनिहाय नोटीस बजावणे आणि सुनावणी घेण्याची कार्यपद्धती अद्याप बीएलओंना स्पष्टपणे देण्यात आलेली नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्यामुळे नोटीस बजावण्यात येणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

8 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

8 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

9 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

9 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

9 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

14 तास ago