महाराष्ट्र

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार! २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’

मोदी सरकारवर लोकशाहीची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ, डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार

मुंबई: संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून, येत्या गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्था वाचवण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकार लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाला कठपुतली बनवून एसआयआरच्या माध्यमातून नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही पक्षाने केला आहे.

‘मतचोरी’ आणि निवडणूक आयोगावर काँग्रेसचे गंभीर आरोप

मतदार याद्यांमधील फेरफार, कथित मतचोरी आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून देशातील निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचा दावा पक्षाने केला आहे.

डिलिमिटेशन आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरही निशाणा

‘अब की बार, ४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याचे भाजपाचे मनसुबे जनतेने निवडणुकीत हाणून पाडले. मात्र, आता मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हा संपूर्ण कारभार हुकूमशाही प्रवृत्तीचा असल्याचे सांगत देशाचे संविधान वाचवणे ही काळाची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये जपण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली असून महाराष्ट्रातही विविध आंदोलनांच्या माध्यमातून संविधान रक्षणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यातील या रॅलीत काँग्रेसचे सर्व सहप्रभारी, खासदार, आमदार, लोकसभा व जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष तसेच सर्व फ्रंटल, सेल आणि विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.या रॅलीच्या माध्यमातून संविधान रक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

1 तास ago

दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…

1 तास ago

हृदयविकार लक्षणे आणि उपाय

मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठी एवढा…

1 तास ago

चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या चित्रीकरण सुविधांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन

गोवा : महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे, विविध योजना आणि विकासात्मक उपक्रमांची…

2 तास ago

राजस्थानमध्ये भीषण अपघात! धुळ्यातील ९ भाविकांचा मृत्यू; जखमींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदे सरसावले

मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश; गंभीर जखमीच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाशी संवाद मुंबई :…

2 तास ago

गुन्हेगारीला थारा नाही! कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नाही : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : कोरेगाव भीमा गावातील शांतता सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ…

5 तास ago