गोवा : महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे, विविध योजना आणि विकासात्मक उपक्रमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने विशेष दालन उभारण्यात आले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे दालन देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती परिसंस्थेची क्षमता, आधुनिक सुविधा आणि उपलब्ध संधी जागतिक चित्रपट क्षेत्रासमोर मांडण्याच्या उद्देशाने महामंडळाने यंदाही इफ्फीमध्ये सहभाग घेतला आहे. सन २०१५ पासून महामंडळ दरवर्षी या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होत असून, यंदाच्या दालनातून महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचा विकासात्मक प्रवास आणि भविष्यातील संधींचे दर्शन घडविण्यात येत आहे.
या विशेष दालनात दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओ, विविध चित्रीकरण स्थळे, चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच महामंडळाच्या विविध योजना, सेवा, उपक्रम, कार्यक्रम आणि अभियानांची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. महाराष्ट्रात चित्रीकरण करू इच्छिणाऱ्या देश-विदेशांतील निर्माते आणि दिग्दर्शकांना आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने हे दालन महत्त्वपूर्ण माहिती केंद्र ठरणार आहे.
चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आजवर केलेल्या कार्याचा व्यापक आढावा या दालनातून मांडण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यापासून ते चित्रपट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना, सेवा आणि उपक्रम राबविण्यापर्यंतच्या प्रयत्नांची माहिती अभ्यागतांना दिली जात आहे.महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष दालन उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्राची चित्रपट निर्मिती क्षमता जागतिक स्तरावर पोहोचविण्याची संधी!
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या या दालनातून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या समृद्ध परिसंस्थेचे सर्वांगीण दर्शन घडविण्याचा प्रयत्न आहे. चित्रीकरणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, महामंडळाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा आणि कार्यक्रमांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राची चित्रपट निर्मिती क्षमता, सुविधा आणि भविष्यातील संधी जागतिक चित्रपट क्षेत्रासमोर मांडण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले.
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…
मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठी एवढा…
मोदी सरकारवर लोकशाहीची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ, डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्यासह ज्येष्ठ नेते…
मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश; गंभीर जखमीच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाशी संवाद मुंबई :…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : कोरेगाव भीमा गावातील शांतता सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ…