महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेटसाठी आता अंतिम मुदतवाढ; या तारखेपर्यंत न बसवल्यास होणार 10 हजारांचा दंड

संभाजीनगर: जर तुम्ही तुमच्या वाहनांना अजूनही HSRP नंबर प्लेट लावली नसेल, तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट्स अनिवार्य केल्या असून यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु आता ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे.

HSRP नंबर प्लेट ऑनलाइन ऑर्डर करण्याची प्रक्रिया (महाराष्ट्र)

1) वेबसाईटवर जा

https://www.mhhsrp.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2) माहिती भरा

वाहन क्रमांक

इंजिन आणि चेसिस नंबर (शेवटचे ५ अंक)

वाहनाचा प्रकार (बाईक / कार)

मालकाचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता

3) Fitment Center किंवा Home Delivery निवडा

जवळचं फिटमेंट सेंटर किंवा

घरपोच सेवा (थोडी अधिक फी)

4) पेमेंट करा

UPI / कार्ड / नेट बँकिंगद्वारे पैसे भरा

पेमेंट झाल्यावर पावती मिळेल

5) Appointment बुक करा

वेळ व दिनांक निवडा

SMS / Email द्वारे कन्फर्मेशन येईल

6) नंबर प्लेट फिट करा

केंद्रावर जा किंवा घरपोच सेवा मिळवा.

तुमचं वाहन HSRP सह अपग्रेड होईल.

नंबर प्लेट शुल्क

दोन चाकी: ₹531 (केंद्रात), ₹656 (घरपोच)

चार चाकी: 879 (केंद्रात), ₹1129 (घरपोच)

15 ऑगस्ट 2025 पूर्वी अपॉइंटमेंट घेतल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

हे लक्षात ठेवा

HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) ही भारत सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढवण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे.

या प्लेटवर एक युनिक सिरीयल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो, ज्यामुळे चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे.

मुदत चुकवल्यास काय होईल

15 ऑगस्ट 2025 नंतरही ज्या वाहनांवर HSRP प्लेट्स नसतील, त्या वाहनचालकांवर वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल आणि मोठा दंड भरावा लागू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

22 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

1 दिवस ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

2 दिवस ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago