महाराष्ट्र

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज पार्टी प्रकरण, विक्रोळी परिसरातील ड्रग्ज माफियांवर झालेल्या कारवाया तसेच ओव्हरडोसच्या घटनांमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ॲड. मातेले म्हणाले, “मुंबईत ड्रग्ज नेटवर्क संघटित पद्धतीने कार्यरत असून युवकांना त्याच्या विळख्यात ओढले जात आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून राज्याच्या भविष्यासाठी गंभीर सामाजिक संकट आहे.”

प्रमुख मागण्या:

“ड्रगमुक्त मुंबई” अभियान तात्काळ जाहीर करून व्यापक स्तरावर राबविणे

ड्रग्ज पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे

महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज जनजागृती मोहीम राबविणे

ड्रग्ज विक्री व पुरवठ्यात सहभागी माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई

पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करून गुप्त माहिती संकलन व प्रतिबंधात्मक कारवाई वाढविणे

युवकांसाठी समुपदेशन केंद्रे व प्रभावी पुनर्वसन व्यवस्था उभारणे

गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या गंभीर विषयाची दखल घेत लवकरच संबंधित विभागांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. येत्या सोमवारी यासंदर्भात सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईसारख्या महानगरात तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवणे ही काळाची गरज असल्याचे ॲड. मातेले यांनी अधोरेखित केले. “ड्रगमुक्त मुंबई” हा केवळ घोषवाक्य नसून एक व्यापक सामाजिक चळवळ म्हणून राबविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago