महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित

हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे; डॉ. नीलम गोऱ्हे”

जेजुरी: समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य स्तुत्य आहे. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की राजकीय मतभेद असले तरी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहतात. ताईंनी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श जपत महिलांना न्याय व शिक्षणाची दिशा दिली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. पुरस्कार सोहळ्यात केवळ बुके न देता, विचारांचे पोषण करणारी पुस्तके भेट दिली पाहिजेत. म्हणूनच मी ताईंना महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर आधारित ‘महाराजा-ए-हिंद’ हे इतिहास असलेले विशेष पुस्तक प्रदान केले.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, तर समाजातील त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या आपल्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. जेजुरी परिसरातील मुरळी प्रथेच्या निर्मूलनासाठी सातत्याने काम करून जवळपास २०० महिलांना व मुलींना या प्रथेतून मुक्त केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हेच अहिल्यादेवी होळकर यांना खरी आदरांजली ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात विचारभेद असले तरी चांगल्या कामांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आमदार निधीतून जेजुरी व इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासास हातभार लावला आहे. स्त्री सक्षमीकरण आणि समाजकल्याणाचे काम हीच माझी खरी ध्येयपूर्ती आहे.”

सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याचे आयोजक विजयराव कोलते अध्यक्ष, मा. ममता लांडे-शिवतारे (आमदार प्रतिनिधी), मा. दिलीपदादा बारभाई (माजी नगराध्यक्ष, जेजुरी), मा. दिलीपआबा यादव (माजी जि.प. सदस्य), मा. सचिन पशवे (अध्यक्ष भाजप, पुरंदर), मा. विठ्ठल सोनवणे (अध्यक्ष शिवसेना, जेजुरी), मा. शांताराम पोमण (सचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान), डॉ. धनाजी नागणे (प्राचार्य शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी) आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेच्या सुदर्शन त्रिगुणाईत, रंजना कुलकर्णी, स्वाती टकले, शालिनी सुर्वे, वैशाली काडे, हेमा घुले तसेच स्त्री आधार केंद्राच्या लता सोनवणे यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

1 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

16 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

21 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

21 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

21 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

21 तास ago