शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजासाठी केस कर्तन व मुंडन विधी दरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता शिरूर तहसिल कार्यालयासमोर प्रतीकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.
ही माहिती शिरूर शहर नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी दिली असून, त्यांनी यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात फुलडाळे यांनी स्पष्ट केले की, दशक्रिया विधी घाट परिसरात नाभिक समाजासाठी रुम, बैठक व्यवस्था, कट्टे, शौचालये, सततचे पाणीपुरवठा, लाईट्स यांसारख्या अत्यावश्यक सोयी उपलब्ध नाहीत. यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबांना तसेच केस कर्तनासाठी जबाबदारी पार पाडणाऱ्या नाभिक बांधवांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.या आंदोलनात प्रितेश फुलडाळे यांच्यासोबत माजी शहर उपाध्यक्ष गोरक्ष शिंदे, अजय गायकवाड, माजी शहराध्यक्ष संतोष शिंदे, बबन वाघमारे यांच्यासह नाभिक समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
फुलडाळे यांनी सांगितले की, “शिरूर नगरपरिषद व संबंधित प्रशासन यांना वारंवार निवेदने दिली गेली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. समाजाच्या अत्यावश्यक गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहोत.
“मुंडन आंदोलन हे केवळ केस कापणे नसून, ही सामाजिक उपेक्षेच्या विरोधातील व्यथा व्यक्त करण्याची एक शांततापूर्ण पद्धत आहे,” असेही फुलडाळे यांनी स्पष्ट केले.नाभिक समाजाच्या व्यावसायिक गरजांकडे आणि समाजातील अत्यावश्यक सेवेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा समाजबांधवांचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…