उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन
मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थामधुन राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील उमेदवारांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन सिंहगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे करण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठा अंतर्गत शैक्षणिक संस्थामध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार पसंती देतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी उमेदवारांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीचा मार्ग अधिक सुकर होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर व सबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर वेब पोर्टल हे प्रामुख्याने एनआरआय, एफएनएस, ओसिआय/पीआयओ व सीआयड्बल्युजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर विविध विद्यापिठांच्या संबंधीत अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या लिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…