मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे.
माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जात असून, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचेही पाहायला मिळाले.
राज्यात भाजप आघाडीवर
राज्यातील एकूण कल पाहता सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
भाजपचे सुमारे 60 उमेदवार आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर
शिवसेना (शिंदे गट) देखील 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
कोल्हापुरात काँग्रेसची दमदार सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे.घुणकी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयी झाल्या आहेत.पंचायत समिती नवे पारगाव येथे काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी झाले आहेत.तसेच घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनी विजय मिळवला आहे.निवडणूक निकालांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही तासांत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…