बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा यांनी तयार केलेली स्मृतीपत्रे, तसेच तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या शोकप्रस्तावाची प्रत गुरुवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्या वतीने सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी विधानमंडळाच्या स्मृतीपत्रांचे वाचन केले, तर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी तामिळनाडू विधानसभेच्या शोकप्रस्तावाचे वाचन करून त्याची प्रत सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमास बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद म्हणून हा कार्यक्रम पार पडला.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…