महाराष्ट्र

आपली स्वतःची स्वप्ने मुलांवर लादू नका:- आमदार रोहित पवार

बारामती (प्रतिनिधी) आई-वडील होणं आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. पण पालक म्हणून जबाबदारी स्विकारणही तितकच महत्त्वाचे असते. मुलांना त्यांची स्वप्ने पाहुद्यात त्यांना त्यांची पात्रता माहिती असते. तुमची अपूर्ण राहीलेली स्वप्ने त्यांच्यावर लादू नका असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आणि शारदाबाई पवार विद्या निकेतन यांच्या वतीने आयोजित केलेल्या पालक सभेत ते बोलत होते.

आमदार पवार पुढे म्हणाले की, योग्य वयात योग्य निर्णय घेतला तर यशाच्या पायऱ्या चढता येतात, आयुष्याचे नियोजन करता येते. ऐनवेळी येणारी निराशा यामुळे टाळता येते. त्यासाठी मुलांचे मित्र बना. त्यांच्या भावना समजून घ्या. घरामध्ये सुसंवाद ठेवा. असेही ते म्हणाले. याप्रसंगी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनीही उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या मानव संसाधन अधिकारी गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकुमार महामुनी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य यशवंत डुंबरे, शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्रमुख प्रा योगेश झणझणे, प्रा शरद ताटे यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आणि पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा यशवंत डुंबरे यांनी केले.

कान्हूर मेसाईच्या प्रशांत रुपनेरची कुस्तीमध्ये जिल्ह्यात बाजी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

3 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago