महाराष्ट्र

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा आयएसटीईकडून मानद फेलोशिपने सन्मान

मुंबई: तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान वित्त मंत्री अर्थ मंत्रालय पंजाब शासन,AICTEचे चेअरमन प्रा. डॉ. टी जी सितारामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या सन्मानाचे श्रेय डॉ. मोहितकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री,चंद्रकांतदादा पाटील,अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग श्री. वेणुगोपाल रेड्डी, तसेच यापूर्वीचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनास दिले आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे.  डॉ. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या कामाची दखल घेवून नुकतेच प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान व आयुक्त, राज्य सामायिक परीक्षा कक्ष या भारतीय प्रशासकीय सेवा स्तराच्या पदाची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे.

देश पातळीवरील इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (Indian Society of Technical Education (ISTE), New Delhi) या संस्थेचे वार्षिक अधिवेशन नुकतेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी, रोपर (पंजाब) (Lamrin Tech Skill University, Ropar (Panjab) येथे संपन्न झाले. यावेळी निती आयोग सदस्य (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे उपस्थित होते, तसेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी,कुलपती डॉ, संदीप सिंग कावरा, आयएसटीई अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई,आयबीएमइंडिया लिमिटेड सल्लागार व हेड प्रोग्राम डेव्हलपमेंट श्री. संजीव मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर अधिवेशनादरम्यान गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ, अहमदाबादचे कुलगुरू डॉ. राजुल के. गज्जर, एरोस्पेस अभियांत्रिकी, आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. सुदरशा कुमार , आयआयटी, न्यू दिल्लीचे प्रबंधक डॉ. अतुल व्यास, व्यवथापकीय संचालक व अभियांत्रिकी विभाग प्रमुख, बी एन वाय चे (BNY) चेन्नई, डॉ. पवन पंजवाई, आदिचुंचनगिरी विद्यापीठ, नागरा, कर्नाटकचे प्रबंधक डॉ. सी. के. सुब्रया, या मान्यवरांचा सुध्दा मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान देवून सत्कार करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago