आरोग्य

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाक घरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात.

आयुर्वेदात वेलचीला ‘क्वीन ऑफ स्पाइसेस’ म्हणजेच ‘मसाल्यांची राणी’ म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. फक्त २ वेलची खाल्ल्याने तुमची पचनशक्ती तर सुधारतेच पण त्याचबरोबर ॲसिडिटी, झोपेची समस्या आणि तोंडातून येणारा वास यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर वेलचीचे हे छोटे दाणे तुमच्या शरीराला डिटॉक्स करून सकाळी ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकतात.

पचनक्रिया सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास पचनक्रिया मजबूत होते. वेलचीमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. हे तुमचं अन्न नीट पचण्यास मदत करतं आणि पोट साफ होतं.

झोपेची गुणवत्ता सुधारते

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा वारंवार झोप येण्यात त्रास होत असेल तर वेलची तुम्हाला मदत करू शकते. वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहतं. झोपण्यापूर्वी खाल्ल्याने चांगली झोप येते.

तोंडातून वास येत नाही

वेलची खाल्ल्याने तोंडातून वास येत नाही. दात आणि हिरड्याही निरोगी राहतात.

वजन कमी करण्यात मदत

वेलची मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. रात्री खाल्ल्याने शरीरातील फॅट वेगाने बर्न होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. सूज कमी होते.

इम्यून सिस्टिम मजबूत 

वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. हे इम्यून सिस्टिम मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

21 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago