मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं.
राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? मराठी लोगो को हम यहापें पटक-पटक कर मारेंगे.. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी काही दाखवलं का? पुढे चालवलं का? बघा कसे असतात.’तसंच तू आम्हाला पटक-पटक के मारणार? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई मै आजाओ.. मुंबई के समुंदर मै डुबे डुबे कर मारेंगे.. यांना हिंमत होते बघा कशी.. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते.. तुम्ही जर अमराठी माणसाबद्दल बोललात तर ती राष्ट्रीय बातमी..आणि हे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना माहिती असतं, सरकार त्यांच्या मागे आहे. कारण, सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल, तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
याशिवाय ‘एक गोष्ट मी त्या दिवशी सांगितली आणि पुन्हा एकदा सांगतोय..तुमची सत्ता असेल ती लोकसभा आणि विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावरती आहे. काहीनाही ५६ इंचाची तुम्हीपण छाती बाहेर काढून फिरा..हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे..परत कोणी जर महाराष्ट्रात वेडवाकडं वागण्याचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. असा कडक इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला.
तत्पुर्वी भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले की, ‘कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठीत सांगावं लागेल. मीरा भाईंदरमध्ये घडलेला प्रसंग छोटा होता. हिंदी सक्तीचा मोर्चा सुरु होता, त्यात व्यापाऱ्याने विरोध केला. त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद करायची गरज नव्हती. तुम्हाला काय वाटतं, मराठी व्यापारी नाहीत. आम्ही काही घेतलं नाही तर तुमचं दुकान चालेल का? महाराष्ट्रामध्ये राहताय तर मराठी शिका, शांतपणे राहा. पण इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार.’
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…