मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
‘ 28 सप्टेंबर 2018 नीट ऐका. धुंधार साबरकांठा गुजरात 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली. आणि 20 हजार बिहाऱ्यांना गुजरातमधून हाकलून दिलं. झाल्या का बातम्या. कुठेही बातम्या दिसणार नाही. हा माणूस त्यानंतर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याला तिकीट दिलं गेलं. तो आमदारही झाला. म्हणजे यांच्या राज्यात वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यातील लोकांना आत घेणार नाही, मारणार, आता परत गुजरातमध्ये झालं. बिहारी लोकांना बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे? हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहेत. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला, पण वर्ष झालं एक रुपया मराठी भाषेसाठी आला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अजून 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं, दुसरं कोणाचं भलं झालं?
उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात? तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल, तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…