महाराष्ट्र

कोल्हापूर चित्र नगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना; मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई: कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीसंदर्भात आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असून, जुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने लहान लहान चित्रफिती तयार करून त्यास समाज माध्यमांवर प्रसारित करावे.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे यासाठी पाहिजे यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट नगरीची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना एम एस आय डी सी ची मदत घेण्याचाही सूचना मंत्री ॲड शेलार यांनी केल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

7 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

7 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

7 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

7 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

7 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

7 तास ago