महाराष्ट्र

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली.

भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या सर्व खासदारांनी त्यांना मत द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

पवार, ठाकरेंकडे मिळून २१ मते

१) महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून ३८ खासदार आहेत. दुसरीकडे महायुतीचे २९ खासदार आहेत. महाराष्ट्रातून राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मते मिळावीत हा फडणवीस यांचा प्रयत्न आहे.

२) त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गुरुवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या दोन नेत्यांनी फडणवीस यांना कसा प्रतिसाद दिला याची माहिती मिळू शकली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. दोघांची मिळून तब्बल २१ मते आहेत. ती मिळविण्याच्या हालचाली फडणवीस यांनी आता सुरू केल्या आहेत.

३) काँग्रेसकडे लोकसभेत १४ व राज्यसभेत ३ अशी १७ मते आहेत. मविआकडील ३८ पैकी एकही मत फुटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago