मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाने केला वडिलांवर जीवघेणा हल्ला

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवरच चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली. याबाबत चंद्रकांत श्रीपती शेवाळे (वय ६४, रा. शेवाळेमळा, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंद्रकांत शेवाळे यांचा मुलगा सुहास चंद्रकांत शेवाळे (वय ३८) हा दारुच्या नशेत घरी आला. त्याने विनाकारण आईला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी वडिलांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी सुहास याने संतापाच्या भरात वडिलांनाच शिवीगाळ करत चाकूने हनुवटीवर, गळ्यावर व उजव्या खांद्याजवळ वार करुन गंभीर जखमी केले.

 

या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार राजेश ढगे हे करत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, मुलाकडून वडिलांवर झालेल्या दुर्दैवी हल्ल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

शिरुर तालुक्यात पैशांच्या वादातुन तरुणावर दगडफेक; सोन्याची चैन लंपास

शिरुर पोलीसांनी पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या कामगारांना गुजरात मध्ये केले अटक 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago