महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच आता त्या पक्षाची सूत्रेही हाती घेण्याच्या तयारीत असून, त्यांनी पक्षातील नेते, मंत्री आणि आमदारांशी संवाद सुरू केला आहे.

नेते-मंत्र्यांना थेट फोन, पाठिंब्यासाठी आभार

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांना फोन करून संवाद साधल्याची माहिती आहे. कठीण काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले असून, पुढील काळातही अशीच साथ आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या संवादामुळे पक्षात एकसंघपणा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

शोकसभेनिमित्त शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतील सहयोग सोसायटीमध्ये आयोजित शोकसभेत पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. या वेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह शरद पवारही उपस्थित होते. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शरद पवारांकडून नातवांना कामकाजाचे धडे

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांना संस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याचं समजत आहे. अजित पवार संस्थेमध्ये कोणती भूमिका बजावत होते, त्यांचं कार्य पुढे कसं नेता येईल, यासंदर्भात इतर विश्वस्तांनीही सविस्तर माहिती दिली.

ही बैठक पार्थ आणि जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानमधील पहिलीच सहभागाची बैठक होती. मात्र अजित पवारांची जागा संस्थेत कोण घेणार, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

3 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

3 तास ago