महाराष्ट्र

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना मजबूत, उबाठाला खिंडार

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई: अमरावतीचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर, ३ माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेता आणि ७ माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रिती बंड, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते. आजच्या पक्ष प्रवेशाने अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत झाली असून उबाठाला खिंडार पडले आहे.

माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखेडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंधे, माजी विरोधी पक्ष नेता सुरेंद्र पोपली यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर, डॉ. राजेश जयपूरकर या ७ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोमंतका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे, शाहुसमाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे. लोकांच्या अडअडचणीला धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. आजच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना अमरावती जिल्ह्यात मजबूत झाली आहे. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी पालघर जिल्ह्यातील एकता वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष भावेश संख्ये, प्रतीक जोशी, सुमीत बारी, मारुती आव्हाड, सोहम राजपूत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते एकता वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

30 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago