नांदेडमध्ये उबाठाला मोठे खिंडार…
मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
याशिवाय उबाठा गटाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्यासह नांदेड शिवसेना उबाठा गटातील जिल्हाप्रमुख माधव पावडे, तालुकाप्रमुख गणेश शिंदे, जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख श्रीमती रोहिणी कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख अभिजीत भालके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी तसेच भोकरचे दादाराव ढगे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या सर्वांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच सर्वांच्या भक्कम साथीने पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनसेवेत तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. या प्रवेशावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर – पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…