महाराष्ट्र

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींचीं तत्वतः मान्यता

नवी दिल्ली: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव वी. उमाशंकर यांना दिले आहेत. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ” केबल कार ” प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे. “ पर्वतमाला परियोजना ” अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकी संदर्भात प्रकल्प अहवाल सादर करताना विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, अशा पद्धतीची एकत्रित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रकल्पाचे देखील सर्वेक्षण करावे अशी सूचना मांडली* याला परिवहन मंत्री, सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला पोहोचता येईल असा एकत्रित वाहतूक आराखडा लवकरच सादर केला जाईल असे आश्वासन दिले.

दरम्यान मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणार ताण लक्षात घेता भविष्यात ” केबल कार ” सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक होते.या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले. या प्रकल्पास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्च्यात देशात यशस्वीपणे राबवलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून भविष्यात वाहतुक कोंडी चा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केला जाईल. त्यासाठी “केबल कार ” प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

3 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

3 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

3 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

19 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

19 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

19 तास ago