महाराष्ट्र

दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना

कणकवली तालुक्यातील असलदे, कळसुली, नांदगाव येथे शिबिर

तळेरे: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 150 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

दिविजा वृद्धाश्रम कोकणातील ग्रामीण भागातील खेड्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव संस्था आहे. दिविजा वृद्धाश्रमार्फत शालेय मुलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. सामाजिक उपक्रमा बरोबरच ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातील एक उपक्रम म्हणजे मोबाईल डेंटल व्हॅन दिविजा वृद्धाश्रम व मुंबई चे डॉ.किसन गारगोटे व त्यांचा पुत्र डॉ कृतेश गारगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी दंत चिकित्साचे आयोजन केले जाते.

त्यामध्ये दाताची किड साफ करणे, दाताचे फिलिंग करणे,दात काढणे,रूट कॅनल,कवळी बसवणे असे उपचार गोर-गरीब जनतेसाठी मोफत केले जातात. जून महिन्यात दिनांक 13 ते 15 जून 2025 या कालावधीत दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५० गरजवंत लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच त्यात ५० रुग्णांचे दात काढण्यात आले. २० जणांचे कवळ्यांचे माप घेण्यात आले. ५० जणांचे दात साफ करण्यात आले तर ३० जणांचे फिलिंग करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजवंत लोकांना दाताचे उपचार मोफत होऊ लागल्याने त्यांच्या ही चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

8 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

8 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

8 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago