महाराष्ट्र

श्रीवर्धनमधील उबाठाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी बांधले घड्याळ हाती…

१६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग

मुंबई: १६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्या सोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले.

१९९५ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले अशी कबुलीही सुनिल तटकरे यांनी दिली.

तुमच्या धाटणीला बाजुला सारून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील झाला आहात हा श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासात दिवस उजाडला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला.

यावेळी उबाठाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सुभाष केकाणे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

8 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago